माननीय संपादक महोदय,
बहुतांची अंतरे, महाराष्ट्र टाईम्स,
मुंबई,
वक्तव्याची किंमत ?
कोणत्याही दंगली मागे हात कुणाचे आणि प्रत्यक्ष सहभाग कुणाचा या प्रश्नाचे उत्तर एकच असते ते म्हणजे सामान्य कार्यकर्ते. नेता आपल्या वक्तव्यांनी प्रतिष्टेसाठी कार्यकर्त्यांना आवाहन करतात. तेच आवाहन भावनिक स्वरूपात गल्लीगल्लीतील तथाकथित समाजसेवक तळागाळातील जनतेपर्यंत पोहचवितो. तीच जनता या समाजसेवकाची काही कामे लक्षात ठेवून आंदोलनात उतरते. त्यातील काही मंडळी गर्दीच्या मानसीकतेत वाहून जात अशी विध्वंस कृत्ये करतात. शेवटी बळी ही हीच सामान्य जनता जाते एकबाजूने गुन्हे दाखल होतात यांच्यावर व दुसऱ्या बाजूने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान केल्याने दुष्काळात तेरावा महिना या प्रमाणे हाच सामान्य नोकरदार वर्ग अजून त्रास सहन करतो. प्रत्येक बंद " शांततापूर्ण " पार पडला असे नेते सांगतात. सार्वजनिक व खाजगी नुकसान कोटयांच्या घरात असते, जीवितहानी वेगळी, मानसिक हानी मोजता येत नाहीच. कोणत्याही सरकार विरोधात असलेले हे नेते बंद चा एल्गार पुकारतात व नंतर आंदोलकांवर गुन्हे नको म्हणून हात जोडतात हा इतिहास पुनः पुन्हा का गिरवतात हे नेते. म्हणूनच कोणत्याही पक्षाने बंद पुकारला तरी राज्यातील सरसकट सर्वच पक्ष अपक्ष नेत्याची जबाबदारी असेल सर्व सार्वजनिक मालमत्त्येच्या नुकसानीची. ही सर्व नुकसान भरपाई या नेत्यांच्या खाजगी मालमत्तेतुन वसूल करावी. तेव्हाच कळेल या नेत्यांना आपल्या वक्तव्याची किंमत.
विठ्ठल बाबुराव घाडी,
533, सेक्टर 5, चारकोप, कांदिवली, मुंबई 67
8108888056
No comments:
Post a Comment