" कष्ट ही अशी प्रेरक शक्ती आहे, जी माणसाची क्षमता तपासते आणि त्याला विकासाच्या मार्गावर नेते."
जीवनात अनंत अडचणी असतात, पण ओठांवर हास्य ठेवा, मनात विश्वप्रार्थना कारण...
कोणत्याही परिस्थितीत जगायचं तर असतंच. मग हसत हसत जगण्यात काय नुकसान आहे...
रोज काही न काही मागतच असतो मग आपले कोणतेही नुकसान न करणारी विश्वप्रार्थना म्हणत म्हणत सर्वांसाठी सर्व काही मागितले तर पुण्य नक्कीच मिळते....!!
🌹सर्वांसाठी शुभ प्रभात 🌹
Wednesday, January 18, 2017
चार जानेवारी दोन हजार सोळा
तीन जानेवारी दोन हजार सोळा
जेव्हा अंडे बाहेरील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन संपते..... पण तेच अंडे आतील ताकदीमुळे फुटते तेव्हा एक जीवन सुरू होते.... आतून मिळालेली ताकद सदैव जीवन घडवते.... प्रश्न आला आतली ताकत कुठे अन कशी दिसते.... आरश्यात आपलेच बाह्य मोहक प्रतिबिंब दिसते... समोरच्या व्यक्तीत आपलंच अंतरंग प्रचितीस येते... मोह पडलेल्या प्रतिबिंबाला एक रूप, आकार, नाव असते... प्रत्येक प्रतिबिंबात अंतरंग खुलत, फुलत, बहरत जाते... आरश्याच्या चौकटीत राहून मागणं खुप काही मोठी गोष्ट नसते.... सर्वांना शब्दाने सुरवात झालेली प्रार्थनाच अंतरंगाला उजळवित असते... 🌸 अश्या अनेक अंतरंगाला उजळविणाऱ्या सर्वांना शुभ सकाळ 🌸
दोन जानेवारी दोन हजार सोळा
महत्व ह्याला नाही कि काय गेलं आणि काय येणार....
महत्व ह्याला आहे आता काय आहे....!!!!
महत्व ह्याला नाही की कोण रोज आपल्या सोबत आहे.....
महत्व ह्याला आहे की गरज पडल्यावर कोण आपल्या सोबत आहे....!!!!
महत्व यालाही नाही कि कोण आपल्या सोबत आहे....
महत्व याला आहे कि आपण कोणा सोबत आहोत....!!!!
महत्व याला नाही कोणत्या माणसांसोबत आहोत....
महत्व याला आहे कोणत्या विचारांसोबत आहोत....!!!!
महत्व विचारांचे हे कि त्याच विचारांची माणसे जोडली जातात....
महत्व विचारांचे असे कि जगातली सर्वच माणसे एकमेकांना जोडून असतात...!!!
याच जोडलेल्या माणसांचे नाते घट्ट घट्ट करू या....
त्यासाठी क्षणोक्षणी शुभ विचारांची
" विश्वप्रार्थना " म्हणू या....!!!
🌸 जोडलेल्या आणि जोडल्या जाणाऱ्या सर्वांसाठी शुभ प्रभात 🌸
एक जानेवारी दोन हजार सोळा
01/01/2016, 1:34 pm - Vitthal Ghadi: 🌺 सच है कि आज का नया कल पुराना हो जायेगा.... हर एक दिन में गम का साया बढता हि जायेगा.... हम इसी जमानेके साथ चल रहे थे, और गमकी आगोश में झूम रहे थे हम... चल दिये थे इस जहां से सब छोड के, मुडकर आ गये सबकुछ देने केलीये हम.... पता चला अब सुख का सच्चा अर्थ मेरे दोस्त, समजते हि मेरे सुख का दरिया सुखं गया.... हर एक के सुख में मेरा सुख छिपा है, इन्सान को मिलने मै अपना पता भूल गया... दोस्तो एक बात तो है नाम और पता अपनी पहचान है... सारे सुख, ऐश्वर्य कि किताब, यह विश्वाप्रार्थना है.... हर पल इन शब्दोंको गुण गुनाते रहना .... यही इस साल कि मेरी सबको शुभकामना.. 😃 नये साल के पहले दिन कि नयी मुस्कान 😀
एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा
ओलसर मातीवर पायांचे ठसे, सुकले, पुसले तरी विसरायचे नसतात... हद़्याच्या मातीवर आठवणीचे ठसे, नवे जपण्यात, जुने ठसे पुसायचे नसतात... दिवसामागुन दिवस झाड वाढत जाते, पालवीला पहात पिकल पान, नजरेआड करायची नसतात.. माणसे भेटतील अनेक ओळख वाढत जाते, समोरच्याला हास्य देताना मागचे सारे चेहरे तिथेच पहायचे असतात... एका चेहऱ्यात अनेक चेहरे पहाणे कठीण असले तरी अशक्य नाही... सर्वाना मागणं सोप्प असतं त्यासाठी विश्वप्रार्थनेचे " शब्द " विसरायचे नसतात.... 🐾 2015 ची अंतिम शुभ सकाळ 🐾
तीस डिसेंबर दोन हजार पंधरा
"झाडांची मुळे पाणी मिळेल याची वाट पाहत बसत नाहीत, ती पाणी शोधण्याच्या प्रयत्नात वाट मिळेल तिकडे धाव घेतात. किंबहुना झाडाला उभं ठेवण्यासाठी जमिनीत आधार शोधत असतात.....! आकाशात झेप घेताना त्याला सुद्धा त्या मुळांचा आठव असतो.. जन्माला आलो अनेकांच्या ऋणात वाढलो एक एक दिस आनंदाने सजला... या प्रवासात आपली साथ लाभली म्हणून उभा आहे जीवनाच्या रंगमंचावर.... आपल्या शुभेच्छा म्हणजे एक एक थेंब अमृताचा, वर्षभर पुरेल हसत खेळत कार्यात रहाण्याचा... प्रत्येकाची साथ अशीच रहावी युगांन युगे त्यासाठी मी प्रार्थना म्हणावी.... त्यांच्या स्मरणात आपला आठव मनात जपतो... कालच्या कृतज्ञतेत आजची शुभ प्रभात पहातो.... 🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏
नींद खुली सपने बिखर गये, पर यारों...
रात के अंधेरे दूर ना होते, तो कितने फसाद होते....
भगवान कि चरणोंमें चढाने फुल खील गये, पर मेरे यारों...
वो महकना छोड देते, तो कितने फसाद होते....
आँसू भरी नजर कुछ कह गयी, पर मेरे यारों...
वो बहेना छोड देते, तो कितने फसाद होते....
सवाल जिंदगीके शराबमें डूबोते है, मेरे यारों,
समंदर शराब के होते, तो कितने फसाद होते....
मैं, मेरे अपनों कि चाहतमें इन्सानियत भूल जाते है लोग...
सबके सुख कि " विश्वप्रार्थना " ना होती, तो कितने फसाद होते....
🌸 सब फसाद मिटाने कि सोचनेवालों सबको, " शुभ प्रभात " 🌸
Subscribe to:
Comments (Atom)