Wednesday, January 18, 2017

एकतीस डिसेंबर दोन हजार पंधरा

ओलसर मातीवर पायांचे ठसे,
सुकले, पुसले तरी विसरायचे नसतात...

हद़्याच्या मातीवर आठवणीचे ठसे,
नवे जपण्यात, जुने ठसे पुसायचे नसतात...

दिवसामागुन दिवस झाड वाढत जाते,
पालवीला पहात पिकल पान, नजरेआड करायची नसतात.. 

माणसे भेटतील अनेक ओळख वाढत जाते,
समोरच्याला हास्य देताना मागचे सारे चेहरे तिथेच पहायचे असतात...

एका चेहऱ्यात अनेक चेहरे पहाणे कठीण असले तरी अशक्य नाही...
सर्वाना मागणं सोप्प असतं त्यासाठी विश्वप्रार्थनेचे " शब्द " विसरायचे नसतात....

  🐾 2015 ची अंतिम शुभ सकाळ  🐾

No comments:

Post a Comment