Wednesday, January 18, 2017

तीस डिसेंबर दोन हजार पंधरा

 "झाडांची मुळे पाणी मिळेल याची वाट पाहत बसत नाहीत,
ती पाणी शोधण्याच्या प्रयत्नात वाट मिळेल तिकडे धाव घेतात.

किंबहुना झाडाला उभं ठेवण्यासाठी जमिनीत आधार शोधत असतात.....!
आकाशात झेप घेताना त्याला सुद्धा त्या मुळांचा आठव असतो..

जन्माला आलो अनेकांच्या ऋणात वाढलो एक एक दिस आनंदाने सजला...

या प्रवासात आपली साथ लाभली म्हणून उभा आहे जीवनाच्या रंगमंचावर....

आपल्या शुभेच्छा म्हणजे एक एक थेंब अमृताचा, वर्षभर पुरेल हसत खेळत कार्यात रहाण्याचा...

प्रत्येकाची साथ अशीच रहावी युगांन युगे त्यासाठी मी प्रार्थना म्हणावी....

त्यांच्या स्मरणात आपला आठव मनात जपतो...
कालच्या कृतज्ञतेत आजची शुभ प्रभात पहातो....

🙏🙏 शुभ सकाळ 🙏🙏

No comments:

Post a Comment