भावना अश्या मनातल्या
शब्दात उतरताना पाहिल्या ..
नजरेत तुझ्या त्या शब्दांच्या
कविता होवून राहिल्या ..
✍🏻साधे शब्द
भावना अश्या मनातल्या
शब्दात उतरताना पाहिल्या ..
नजरेत तुझ्या त्या शब्दांच्या
कविता होवून राहिल्या ..
✍🏻साधे शब्द
खेळ जरी शब्दांचा
त्याच्या भावना पसरतात..
त्याच आनंदमयी शब्दांची
ठेव मनातच जपतात..
✍🏻साधे शब्द
शब्द जरी फेकले कुणी,
झेलून घ्या कधीतरी..
आनंदाची लयलूट नसेल,
झुळूक मिळेल एकदातरी..
✍🏻साधे शब्द
तापलेली माती अशी
घेते थेंबाला सामावून..
मिलनाची ओढच ती
यावे लागते त्याला धावून..
✍🏻साधे शब्द
भावना अश्या नजरेतल्या
शब्दातून कश्या व्यक्त करू..
चित्र त्या नजरेत माझे
नजरेतूनच ते समजून घेऊ..
साधे शब्द
नम्र झाला भुता तेणे कोंडले अनंता
संतांचा संस्कार आपण समजून घेतला..
प्राणीमात्रात अस्तित्व देवाचेच दिसले
नमस्कार त्याच्या चरणी रुजू जाहला..
साधे शब्द
भावना अश्या पावसातल्या
शब्दातून कश्या व्यक्त करू..
शब्द ही विरून जातील माझे
नजरेतूनच ते समजून घेऊ..
✍🏻साधे शब्द
कोंबड्यांची बांग नी बगळ्यांची रांग,
चिमण्यांचा किलबिलाट अन पानांची सळसळ....
उजळत आली दाहीदिशा हि सूर्याची किरणे,
मंद मंद वारा धुंद करतो फुलांचा दरवळ....
साधे शब्द
एक धागा गुंफला भावनेत,
कर्तव्याच्या रंगात रंगला....
जीवा भावाची नाते जपताना,
समाजाची नाळ विसरला....
साधे शब्द
हलता पान त्याची सत्ता.
जे त्याका पाहिजे ताच देता..
अळवावरच्या थेंबाची काय चिंता . .
तो चमकता नि मातीत मिसळता . .
साधे शब्द
लिहितो कुठे फ़क्त शब्द गोळा करतो ...त्यांच्या स्मरणात शब्दांना ओळीत बसवतो....आनंद वाटण्यासाठीच ते मी आपल्याला पाठवतो...ते पहातात वाचतात आणि भर भरून कौतुक करतात....
साधे शब्द
रात्री शब्द कधी माझे झाले
त्या शब्दांना अर्थ लाभले..
माझ्या मनात थिजून राहिले..
✍🏻साधे शब्द