Wednesday, February 17, 2016

दिवसापरिस रात्र खूप लहान आहे....
प्रश्नाच्या गर्दीतच शिकण्याचे समाधान आहे....

माणसांच्या बाजारात देवाचं दुकान आहे,
नाम भाव स्मरण असच काहीस सामान आहे...

जन्मा आलो आणि मी निसर्गाकडे  गहाण आहे...
जे जे घेतलं ते प्रत्येकाचं परत देणं आहे....

मी पणाची एक निरर्थक कमान आहे....
विश्वप्रार्थना त्याखाली निवांत होण्याचं साधन आहे....

🌸  शुभ दिवसाच्या शुभेच्छा  🌸

shubh prabhat 16 feb 2016

 देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
दिवसात दिसलेल्या सर्व इच्छा माझ्या पुर्ण करून घेतोस...

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
दिवसा समोर येऊन चुका माझ्याच दाखवतोस,
त्या सुधारण्याची तेव्हाच संधी सुद्धा देतोस...

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
कर्म आपलेच माझ्याकडून करवुनी घेतोस,
फळ म्हणून शांत झोप देऊन जागतोस....

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
बोल बोल म्हणत किती बोलवुनी घेतोस,
अर्थ मात्र स्वच्छ चांदण्यात समजावीत असतोस....

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
दिवसभरात हजारो रूपात अनोळखी भासतोस,
खरी ओळख आवडलेल्या रूपात जागवून रहातोस...

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
काय देऊ तुला म्हणता म्हणता रात्र पुन्हा जवळ येते,
सर्वासाठी मागताना विश्वप्रार्थनेतून सर्वच मिळून जाते...

🌸  त्याच्या सोबत दिनरात मला  सोबत ठेवणाऱ्या सर्वांना शुभ दिवस  🌸

shubh prabhat 14 feb 2016

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुला भेटण्याच्या ओढीने वाजणाऱ्या त्या गजरावर तर उगवणाऱ्या पहाटेवर....

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
भेटीचा आनंद ओसंडून वहाणाऱ्या त्या चेहऱ्यावर तर त्या कोवळ्या उन्हावर....

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या शब्दांच्या बागेत फिरताना बसलो होतो त्या झाडावर तर त्याच्या सावलीवर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या निरागस हास्यात डुंबताना भिजलो होतो त्या नदीवर तर तिच्या निर्मळ पाण्यावर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या थांग न लागणाऱ्या डोळ्यात हरवलो जेव्हा त्या सागरावर तर त्याच्या प्रेमळ लाटांवर....

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
खंबीरपणे माझ्या पाठीशी तू उभी असलेल्या त्या धरतीवर तर दामदुपटीने परत देणाऱ्या तिच्या मातीवर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या अस्तित्वाला ओळख देणाऱ्या तुझ्या माता पित्यावर तर त्यांच्या सर्व नातलगावर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तू ठेवलेल्या विश्वासावर अन मनात भरून राहिलेल्या विश्वाप्रार्थनेवर तर तिच्या प्रत्येक शब्दावर....

🌸  होय खरच ! आहे प्रेम माझं तुम्हांवर....
ओळख नसताना माझ्यावर प्रेम केलेल्या तुम्हां सर्वावर तर तुमच्यातील देवावर....🌸
      आजची गुलाबी शुभ प्रभात 🌺

shubha prabhat 12 feb 2016

 रात के अंधेरे का खौफ, और हारने का डर बार बार देखा है।
सपने सच करने का हौसला लेकर सुरज हर सुबह आता है।

उसकी चमक और रोशनी से सारा जहां खील उठता है।
पर उसका देने का अनोखा अंदाज कौन कहां देखता है।

हाथ कि लकीर के पीछे का राज और नसीब किसने देखा है।
हम ख्वाब देखते है सच करने कि चाहत और हौसला किसने देखा है।

कई दिनोसे हमे एक एहसास हो रहा है दे तो क्या दें।
पाने कि भागदौड मिलता कितना है जो दूसरोंके हाथ रख दें।

अब जा के पता चला है इन्सानके अंदर रब बसता है।
दूसरोंको मांगनेसे सबकुछ, पहले हमें रब देता है।

अब क्या मांगे यह तो तय हो गया है।
विश्वप्रार्थनासे नाता जो जुड गया है।

🌸 इस सुंदर दुनियासे नाता जोडणेवाले हर एक को शुभ दिन कि शुभकामनाये 🌸

Tuesday, February 9, 2016

shubha prabhat 9 feb 16

🌺🌺 स्वप्नाच्या हिंदोळ्यावर झुलत होतो,
एक सुंदर परी, देऊन रात गेली...

क्षणा क्षणाचा हिशोब मांडत होतो,
     जगण्याचे गुपित, सांगून रात गेली....

दुःखाच्याच आठवणी गोंजारत होतो,
      आसवांच्या नदीला, वळसा मारून रात गेली....

मोह मायेच्या भोवऱ्यात अडकलो होतो,
      नात्याचा खरा अर्थ, समजावून रात गेली....

काम, क्रोध, लोभात गुंतलो होतो,
      विवेकाचा धडा, शिकवून गेली....

देवाला शोधणाऱ्या गर्दीत हरवलो होतो,
      देवाचाच पत्ता, ठेवून रात गेली....

आता इतरांच्या सुखात माझे सुख जपत होतो,
      विश्वप्रार्थनेचे शब्द, ऐकून रात गेली....

🌸 गेलेल्या रात्री नंतर उगवणाऱ्या दिवसाच्या सर्वाना शुभेच्छा...🌸

                              

Sunday, February 7, 2016

शुभ प्रभात सात दोन हजार सोळा

बाहेर किलबिलाट झाला ....
पापण्या हलकेच किलकीलल्या...
स्वप्नाची रांग संपली होती, एक दुसर रेंगाळल होत...

कोण आलं होत, कोण बोललं कोण हसलं होत...
कोणी काय दिल होत, कोण काय देणार होत...

विचारात होतो आणि पंख्याच पात दृष्टीस पडलं होत...
काय होत ते निर्जीव खेळणं जस, सुरु केलं तर फिरलं...

थकून कधीच नाही थांबलं ना कधी कुरकुरल...
देणाऱ्याच्या यादीत एक नाव वाढलं होत....

सातत्यातून शीतलता अन आनंद देऊन जात...
विचार, उच्चार, आचार एक एक पातच तर असत...

शुभ चिंतनाची मोटार त्यांना प्रकट करते...
स्मरण नावाची एक कळ मनात दडलेली असते....

स्मरणाने मोटर फिरते अन सुख दुःख मिळवीत असते...
स्मरण अन चिंतनाची विश्वप्रार्थना फक्त सुखाचाच गारवा देते....

🌸 सुख आनंदाचा गारवा अनुभवणाऱ्या सर्वांसाठी शुभ दिन ....🌸

                                  विठ्ठल घाडी  चारकोप  ९१६७७५५२०३

Saturday, February 6, 2016

शुभ प्रभात सहा फेब्रुवारी दोन हजार सोळा

मी एक आहे, त्याला अनेक नावं आहेत......

माझे एक नाव आहे, त्याला अनेक गावं आहेत....

माझे एक गाव आहे , त्या गावात अनेक माणसे आहेत....

मी एक माणूस आहे, माझी एक ओळख आहे....

माझ्या ओळखीला एक स्वरूप आहे, हाच तर मोठा प्रश्न आहे....

माझ स्वरूप एक असलं तरी रूपे अनेक आहेत....

माझ्या सर्व रूपांची सुख दुःखे सारखीच आहेत म्हणूनच. . . .
   " विश्वप्रार्थना " सर्वांसाठी एकच आहे....

🌸 सर्वासाठी असलेल्या विश्वप्रार्थनेनी सर्वांना शुभ प्रभात  🌸

                            विठ्ठल घाडी   चारकोप  ९१६७७५५२०३

Friday, February 5, 2016

शुभ प्रभात पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा

मोहब्बत तो मैंने कि है....
तुझसे कि ...तेरे ख्वाबसे कि है...

मोहब्बत तो मैंने कि है....
तेरे जहांसे कि, तेरे इंसानसे कि है....

मोहब्बत तो मैंने कि है...
इंसान के प्यार से कि, उसके नफरत से कि है....

मोहब्बत तो मैंने कि है....
सबके ख्वाईश से कि, हर एक के जिद से कि है....

मोहब्बत तो मैंने कि है...
मेरे अपनोंसे कि, अपने पराये सभीसे कि है...

मोहब्बत मैंने विश्वप्रार्थना से कि है..
ऐ खुदा ! उसीमें तो तूने, सभीके सुख शांती कि तस्वीर दिखायी है....

🌸  मेरे दिल कि तस्वीरमें बसनेवालो सभीको शुभ दिन कि शुभकामना...🌸

                          विठ्ठल घाडी   चारकोप
                                     ९१६७७५५२०३

Thursday, February 4, 2016

शुभ प्रभात चार फेब्रुवारी दोन हजार सोळा

माझ्या स्वप्नातील परी आता दिसू लागली,
          प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पहात बागडू लागली....

माझ्या स्वप्नातील परी आता बोलू लागली,
          माझ्याच प्रश्नाची उत्तरे  सहज देऊ लागली....

माझ्या स्वप्नाची परी आता हसू लागली,
          माझ्याच अश्रूंच्या थेंबाचे मोल समजावू लागली....

माझ्या स्वप्नातील परी आता पाहू लागली,
          माझ्याच कॅनव्हासवर आपले रंग भरू लागली....

माझ्या स्वप्नातील परी आता चालू लागली,
          माझ्याच कार्यात सदा पुढे पुढे राहू लागली....

माझ्या स्वप्नातील परी आता गाऊ लागली,
         आपल्या विश्वप्रार्थनेचे शब्द न शब्द प्राशून आली....

🌸 माझ्या स्वप्नातील परी सोबत आपला दिवस आनंदात जावो...🌸

                        विठ्ठल घाडी  चारकोप
                           ९१६७७५५२०३

शुभ प्रभात तीन फेब्रुवारी दोन हजार सोळा

माझ्या स्वप्नातील परी आता दिसू लागली,
          प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पहात बागडू लागली....

मागे वळून पहाता काळोख दाटला होता,
एक प्रकाशाचा किरण, लुकलकत होता....

मागे वळून पहाता प्रश्नाचा थवा थिजला होता...
उत्तराला शब्दाचा तुझ्या, आसरा मिळाला होता....

मागे वळून पहाता गाभारा भरला होता....
देवाची ओळख होताच, तो रिकामा झाला होता....

मागे वळून पहाता हिशोब राहिला होता,
घेण सरले आता, देण्याचाच विचार मनात होता....

मागे वळून पहाता मार्ग सापडला होता,
देताना विश्वप्रार्थना घेत रहावे, हा मंत्र नवा होता....

        🌸  मागे वळून पहाता सर्वाना      शुभ प्रभात  🌸

                                 विठ्ठल घाडी  चारकोप
                                    ९१६७७५५२०३

शुभ प्रभात दोन फेब्रुवारी दोन हजार सोळा

पसरता किरणे पहाटेची , हलकेच निघून रात गेली....
स्वप्नांना नवे पंख, देऊन रात गेली....

स्वप्नातील काजवे हि, घेतील भरारी उत्कर्षाची...
त्यांच्या नैराश्याचे पंख, छाटून रात गेली....

स्वप्नातील मनसुबे आता, उधळणार नाहीच कदापी...
त्या निरुत्तर प्रश्नांचे गाठोडे, घेऊन रात गेली...

स्वप्नातील कॅनव्हास माझा, आता रंगेल सप्तरंगांनी....
नवं नव्या रंगानी मनाला, रंगवून रात गेली....

पापे कितीक होती, सत्कर्माचा अर्थ नव्याने कळला....
अट्टाहास शुभ चिंतनाचा, मागूनी रात गेली....

माझ्यातले दिव्यत्व आता,  मज जाणवू लागले...
सर्वांसाठीच " विश्वप्रार्थना " मुखी वदवून रात गेली....

🌸 अशी सुंदर पहाट पहाणाऱ्या सर्वांना शुभ प्रभात  🌸
                         विठ्ठल घाडी  चारकोप
                             ९१६७७५५२०३

Monday, February 1, 2016

shubh prabhat 1 februvari 2016

🌺🌺  बघायला गेलं तर खूप आहे,
            रोजच्या दुःखाला वेग वेगळं रूप आहे....

शोधायला गेलं तर खूप आहे,
            निसर्गाचे " देणं " शिकलो तर, तेच खरं सुख आहे....

सोडायला गेलं तर खूप आहे,
            राग लोभाला गंधित करणारे,
" शुभ चिंतन " हेच धूप आहे....

द्यायला गेलं तर खूप आहे,
         देतानाच सहस्त्रपटीने मिळते,
हीच ग्यानबाची मेख आहे...

मागायला गेलं तर खूप आहे...
          मागताना " निस्वार्थ " भाव जपण्याचे एक "शास्त्र" आहे....

मिळवायला गेलं तर खूप आहे,
           विश्वप्रार्थनेतच " संकल्प सिध्दीचे गुपित " आहे.

🌸  संकल्प असलेल्या सर्वांना
           शुभप्रभात. 🌸
                             vitthal ghadi charkop
                                91677 55203