Wednesday, February 17, 2016

shubh prabhat 14 feb 2016

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुला भेटण्याच्या ओढीने वाजणाऱ्या त्या गजरावर तर उगवणाऱ्या पहाटेवर....

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
भेटीचा आनंद ओसंडून वहाणाऱ्या त्या चेहऱ्यावर तर त्या कोवळ्या उन्हावर....

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या शब्दांच्या बागेत फिरताना बसलो होतो त्या झाडावर तर त्याच्या सावलीवर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या निरागस हास्यात डुंबताना भिजलो होतो त्या नदीवर तर तिच्या निर्मळ पाण्यावर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या थांग न लागणाऱ्या डोळ्यात हरवलो जेव्हा त्या सागरावर तर त्याच्या प्रेमळ लाटांवर....

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
खंबीरपणे माझ्या पाठीशी तू उभी असलेल्या त्या धरतीवर तर दामदुपटीने परत देणाऱ्या तिच्या मातीवर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या अस्तित्वाला ओळख देणाऱ्या तुझ्या माता पित्यावर तर त्यांच्या सर्व नातलगावर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तू ठेवलेल्या विश्वासावर अन मनात भरून राहिलेल्या विश्वाप्रार्थनेवर तर तिच्या प्रत्येक शब्दावर....

🌸  होय खरच ! आहे प्रेम माझं तुम्हांवर....
ओळख नसताना माझ्यावर प्रेम केलेल्या तुम्हां सर्वावर तर तुमच्यातील देवावर....🌸
      आजची गुलाबी शुभ प्रभात 🌺

No comments:

Post a Comment