Thursday, February 4, 2016

शुभ प्रभात तीन फेब्रुवारी दोन हजार सोळा

माझ्या स्वप्नातील परी आता दिसू लागली,
          प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पहात बागडू लागली....

मागे वळून पहाता काळोख दाटला होता,
एक प्रकाशाचा किरण, लुकलकत होता....

मागे वळून पहाता प्रश्नाचा थवा थिजला होता...
उत्तराला शब्दाचा तुझ्या, आसरा मिळाला होता....

मागे वळून पहाता गाभारा भरला होता....
देवाची ओळख होताच, तो रिकामा झाला होता....

मागे वळून पहाता हिशोब राहिला होता,
घेण सरले आता, देण्याचाच विचार मनात होता....

मागे वळून पहाता मार्ग सापडला होता,
देताना विश्वप्रार्थना घेत रहावे, हा मंत्र नवा होता....

        🌸  मागे वळून पहाता सर्वाना      शुभ प्रभात  🌸

                                 विठ्ठल घाडी  चारकोप
                                    ९१६७७५५२०३

No comments:

Post a Comment