Thursday, January 21, 2016

शुभ प्रभात वीस जानेवारी दोन हजार सोळा

आज स्वप्नात नाजूक पावलं वाजली....
       चिमुकल्या बोटांच्या स्पर्शानी जाग आली...

       ती परी होती का सोनपरी माझेच मला कळेना....
       खुदू खुदू हास्य तिचे मनातून काही निघेना....

       कोण होती, का आली प्रश्नात मी अडाक्लो नाही...
       ती विश्वासक नजर ते निर्मळ हास्य मी विसरणार नाही....

        तीच ते निरागस दिसणं शोधण्याचा मी प्रयत्न करतोय....
       प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच हास्य झळकताना पहातोय....

       परीच्या नाजूक,कोमल स्पर्शात आनंदच वहाताना पाहिला....
       विश्वप्रार्थनेचा शब्द न शब्द जसा मागण सोडून देणच शिकवून राहिला...

 सर्वाना काही न काही  देणाऱ्या तुम्हा सर्वांना शुभ प्रभात....

                               विठ्ठल घाडी , चारकोप
                                 ९१६७७५५२०३

No comments:

Post a Comment