Wednesday, January 6, 2016

शुभ प्रभात पाच जानेवारी दोन हजार सोळा

आकाशात लाखो तारे असतात , चमकताना काहीच दिसतात...

     आपल्या आजूबाजूला चालणारे अनेक असतात,
साथ संगत काहीच निभावतात...

ढग काळे होऊन आसमंतात पसरतात,
आवाज न करता काहीच बरसतात....

    जीवनात दुःखाचीच गर्दी वाढताना दिसते,
टाळता न येणारी काहीच संख्या असते....

      स्वतःसाठी मागणारी सर्वच असतात,
सर्वांसाठी मागून काहीच निरपेक्षपणा जगतात....
    
     प्रत्येकाच्या प्रार्थना वेगवेगळ्या असतात,
विश्वप्रार्थनेत सर्व प्रार्थना सामावलेल्या दिसतात....

🙏  प्रार्थनेतील सर्वांना शुभ प्रभात  🙏
                                                         विठ्ठल घाडी, चारकोप
  vitthala.blogspot.com

No comments:

Post a Comment