Thursday, January 28, 2016

शुभ प्रभात एकोणतीस जानेवारी दोन हजार सोळा

रात्रीच्या काळोखात भीतीचा लवलेश नसावा....
         प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा...

पहाटेचा आनंद इतरांना वाटावा...
          -प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा...

मनातला प्राजक्त सगळीकडे दरवळावा....
         प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा...

जगातला एक एक प्रश्न सहज सुटावा....
        प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा...

दिवसभराचा ताण थोडासा कमी व्हावा...
          प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा....

पुन्हा निवांत एक एक क्षण आठवावा....
           प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा....

जगलेल्या प्रत्येक क्षणात सर्वांचा सहभाग आठवला .....
         त्यासाठीच तर प्रार्थनेचा शब्द न शब्द सर्वांसाठी मागावा ....

 प्रत्येकाच्या जीवनात सहभाग असलेल्या सर्वांना शुभ प्रभात

                                vitthal ghadi , charkop
                                  9167755203

No comments:

Post a Comment