Wednesday, January 6, 2016

विठ्ठल एकरूप जाहला.....

पांडुरंगाला शोधावयास राऊळात गेलो,

तो पुंडलिकाच्या सेवेत होता जनाईच्या भावात होता....
माणसांच्या गावात होता तर नामाच्या गजरात होता...

        टाळ चिपळीच्या एक सुरात होता तर मृदूंगाच्या नादात होता...
        माझ्याच विचारात भासला तर झाडांच्या पानात सळसळला...

वेलीच्या कळीत फुलला तर फुलांच्या गंधात दरवळला...
विश्वात ठासून भरला तर प्रत्येक जीवात समोर उभा ठाकला....

        आसमंतात निळ्या रंगात शोभला तर अथांग सागरात सहज उतरला....
        पहाटेच्या किलबिलाटात जागला तर बोबड्या बोलात दुमदुमला....

थरथरत्या स्पर्शात आनंदला तर तरुण स्वप्नात झेपावला..
अभंगाच्या शब्दात होता तर भक्तांच्या ओठात होता...

शब्दांचे अर्थ अन
     अभंगाचा भावार्थ जाणला तर...
तो माझ्याच हृदयात होता....
         माझ्याच हृदयात होता....

                    आज मी पांडुरंग पाहिला समोर विठ्ठलच भेटला...
                    त्या दिव्य शब्दात उमगला त्याच नजरेनं पाहिला ....

      विठ्ठल एकरूप जाहला....
              विठ्ठल एकरूप जाहला.....


                                          विठ्ठल घाडी , चारकोप
                                               ५ जाने २०१६

No comments:

Post a Comment