Wednesday, February 17, 2016

दिवसापरिस रात्र खूप लहान आहे....
प्रश्नाच्या गर्दीतच शिकण्याचे समाधान आहे....

माणसांच्या बाजारात देवाचं दुकान आहे,
नाम भाव स्मरण असच काहीस सामान आहे...

जन्मा आलो आणि मी निसर्गाकडे  गहाण आहे...
जे जे घेतलं ते प्रत्येकाचं परत देणं आहे....

मी पणाची एक निरर्थक कमान आहे....
विश्वप्रार्थना त्याखाली निवांत होण्याचं साधन आहे....

🌸  शुभ दिवसाच्या शुभेच्छा  🌸

shubh prabhat 16 feb 2016

 देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
दिवसात दिसलेल्या सर्व इच्छा माझ्या पुर्ण करून घेतोस...

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
दिवसा समोर येऊन चुका माझ्याच दाखवतोस,
त्या सुधारण्याची तेव्हाच संधी सुद्धा देतोस...

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
कर्म आपलेच माझ्याकडून करवुनी घेतोस,
फळ म्हणून शांत झोप देऊन जागतोस....

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
बोल बोल म्हणत किती बोलवुनी घेतोस,
अर्थ मात्र स्वच्छ चांदण्यात समजावीत असतोस....

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
दिवसभरात हजारो रूपात अनोळखी भासतोस,
खरी ओळख आवडलेल्या रूपात जागवून रहातोस...

देवा तू रोज माझ्या स्वप्नात यावे...
काय देऊ तुला म्हणता म्हणता रात्र पुन्हा जवळ येते,
सर्वासाठी मागताना विश्वप्रार्थनेतून सर्वच मिळून जाते...

🌸  त्याच्या सोबत दिनरात मला  सोबत ठेवणाऱ्या सर्वांना शुभ दिवस  🌸

shubh prabhat 14 feb 2016

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुला भेटण्याच्या ओढीने वाजणाऱ्या त्या गजरावर तर उगवणाऱ्या पहाटेवर....

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
भेटीचा आनंद ओसंडून वहाणाऱ्या त्या चेहऱ्यावर तर त्या कोवळ्या उन्हावर....

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या शब्दांच्या बागेत फिरताना बसलो होतो त्या झाडावर तर त्याच्या सावलीवर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या निरागस हास्यात डुंबताना भिजलो होतो त्या नदीवर तर तिच्या निर्मळ पाण्यावर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या थांग न लागणाऱ्या डोळ्यात हरवलो जेव्हा त्या सागरावर तर त्याच्या प्रेमळ लाटांवर....

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
खंबीरपणे माझ्या पाठीशी तू उभी असलेल्या त्या धरतीवर तर दामदुपटीने परत देणाऱ्या तिच्या मातीवर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तुझ्या अस्तित्वाला ओळख देणाऱ्या तुझ्या माता पित्यावर तर त्यांच्या सर्व नातलगावर...

होय खरच ! आहे प्रेम माझं तुझ्यावर....
तू ठेवलेल्या विश्वासावर अन मनात भरून राहिलेल्या विश्वाप्रार्थनेवर तर तिच्या प्रत्येक शब्दावर....

🌸  होय खरच ! आहे प्रेम माझं तुम्हांवर....
ओळख नसताना माझ्यावर प्रेम केलेल्या तुम्हां सर्वावर तर तुमच्यातील देवावर....🌸
      आजची गुलाबी शुभ प्रभात 🌺

shubha prabhat 12 feb 2016

 रात के अंधेरे का खौफ, और हारने का डर बार बार देखा है।
सपने सच करने का हौसला लेकर सुरज हर सुबह आता है।

उसकी चमक और रोशनी से सारा जहां खील उठता है।
पर उसका देने का अनोखा अंदाज कौन कहां देखता है।

हाथ कि लकीर के पीछे का राज और नसीब किसने देखा है।
हम ख्वाब देखते है सच करने कि चाहत और हौसला किसने देखा है।

कई दिनोसे हमे एक एहसास हो रहा है दे तो क्या दें।
पाने कि भागदौड मिलता कितना है जो दूसरोंके हाथ रख दें।

अब जा के पता चला है इन्सानके अंदर रब बसता है।
दूसरोंको मांगनेसे सबकुछ, पहले हमें रब देता है।

अब क्या मांगे यह तो तय हो गया है।
विश्वप्रार्थनासे नाता जो जुड गया है।

🌸 इस सुंदर दुनियासे नाता जोडणेवाले हर एक को शुभ दिन कि शुभकामनाये 🌸

Tuesday, February 9, 2016

shubha prabhat 9 feb 16

🌺🌺 स्वप्नाच्या हिंदोळ्यावर झुलत होतो,
एक सुंदर परी, देऊन रात गेली...

क्षणा क्षणाचा हिशोब मांडत होतो,
     जगण्याचे गुपित, सांगून रात गेली....

दुःखाच्याच आठवणी गोंजारत होतो,
      आसवांच्या नदीला, वळसा मारून रात गेली....

मोह मायेच्या भोवऱ्यात अडकलो होतो,
      नात्याचा खरा अर्थ, समजावून रात गेली....

काम, क्रोध, लोभात गुंतलो होतो,
      विवेकाचा धडा, शिकवून गेली....

देवाला शोधणाऱ्या गर्दीत हरवलो होतो,
      देवाचाच पत्ता, ठेवून रात गेली....

आता इतरांच्या सुखात माझे सुख जपत होतो,
      विश्वप्रार्थनेचे शब्द, ऐकून रात गेली....

🌸 गेलेल्या रात्री नंतर उगवणाऱ्या दिवसाच्या सर्वाना शुभेच्छा...🌸

                              

Sunday, February 7, 2016

शुभ प्रभात सात दोन हजार सोळा

बाहेर किलबिलाट झाला ....
पापण्या हलकेच किलकीलल्या...
स्वप्नाची रांग संपली होती, एक दुसर रेंगाळल होत...

कोण आलं होत, कोण बोललं कोण हसलं होत...
कोणी काय दिल होत, कोण काय देणार होत...

विचारात होतो आणि पंख्याच पात दृष्टीस पडलं होत...
काय होत ते निर्जीव खेळणं जस, सुरु केलं तर फिरलं...

थकून कधीच नाही थांबलं ना कधी कुरकुरल...
देणाऱ्याच्या यादीत एक नाव वाढलं होत....

सातत्यातून शीतलता अन आनंद देऊन जात...
विचार, उच्चार, आचार एक एक पातच तर असत...

शुभ चिंतनाची मोटार त्यांना प्रकट करते...
स्मरण नावाची एक कळ मनात दडलेली असते....

स्मरणाने मोटर फिरते अन सुख दुःख मिळवीत असते...
स्मरण अन चिंतनाची विश्वप्रार्थना फक्त सुखाचाच गारवा देते....

🌸 सुख आनंदाचा गारवा अनुभवणाऱ्या सर्वांसाठी शुभ दिन ....🌸

                                  विठ्ठल घाडी  चारकोप  ९१६७७५५२०३

Saturday, February 6, 2016

शुभ प्रभात सहा फेब्रुवारी दोन हजार सोळा

मी एक आहे, त्याला अनेक नावं आहेत......

माझे एक नाव आहे, त्याला अनेक गावं आहेत....

माझे एक गाव आहे , त्या गावात अनेक माणसे आहेत....

मी एक माणूस आहे, माझी एक ओळख आहे....

माझ्या ओळखीला एक स्वरूप आहे, हाच तर मोठा प्रश्न आहे....

माझ स्वरूप एक असलं तरी रूपे अनेक आहेत....

माझ्या सर्व रूपांची सुख दुःखे सारखीच आहेत म्हणूनच. . . .
   " विश्वप्रार्थना " सर्वांसाठी एकच आहे....

🌸 सर्वासाठी असलेल्या विश्वप्रार्थनेनी सर्वांना शुभ प्रभात  🌸

                            विठ्ठल घाडी   चारकोप  ९१६७७५५२०३

Friday, February 5, 2016

शुभ प्रभात पाच फेब्रुवारी दोन हजार सोळा

मोहब्बत तो मैंने कि है....
तुझसे कि ...तेरे ख्वाबसे कि है...

मोहब्बत तो मैंने कि है....
तेरे जहांसे कि, तेरे इंसानसे कि है....

मोहब्बत तो मैंने कि है...
इंसान के प्यार से कि, उसके नफरत से कि है....

मोहब्बत तो मैंने कि है....
सबके ख्वाईश से कि, हर एक के जिद से कि है....

मोहब्बत तो मैंने कि है...
मेरे अपनोंसे कि, अपने पराये सभीसे कि है...

मोहब्बत मैंने विश्वप्रार्थना से कि है..
ऐ खुदा ! उसीमें तो तूने, सभीके सुख शांती कि तस्वीर दिखायी है....

🌸  मेरे दिल कि तस्वीरमें बसनेवालो सभीको शुभ दिन कि शुभकामना...🌸

                          विठ्ठल घाडी   चारकोप
                                     ९१६७७५५२०३

Thursday, February 4, 2016

शुभ प्रभात चार फेब्रुवारी दोन हजार सोळा

माझ्या स्वप्नातील परी आता दिसू लागली,
          प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पहात बागडू लागली....

माझ्या स्वप्नातील परी आता बोलू लागली,
          माझ्याच प्रश्नाची उत्तरे  सहज देऊ लागली....

माझ्या स्वप्नाची परी आता हसू लागली,
          माझ्याच अश्रूंच्या थेंबाचे मोल समजावू लागली....

माझ्या स्वप्नातील परी आता पाहू लागली,
          माझ्याच कॅनव्हासवर आपले रंग भरू लागली....

माझ्या स्वप्नातील परी आता चालू लागली,
          माझ्याच कार्यात सदा पुढे पुढे राहू लागली....

माझ्या स्वप्नातील परी आता गाऊ लागली,
         आपल्या विश्वप्रार्थनेचे शब्द न शब्द प्राशून आली....

🌸 माझ्या स्वप्नातील परी सोबत आपला दिवस आनंदात जावो...🌸

                        विठ्ठल घाडी  चारकोप
                           ९१६७७५५२०३

शुभ प्रभात तीन फेब्रुवारी दोन हजार सोळा

माझ्या स्वप्नातील परी आता दिसू लागली,
          प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद पहात बागडू लागली....

मागे वळून पहाता काळोख दाटला होता,
एक प्रकाशाचा किरण, लुकलकत होता....

मागे वळून पहाता प्रश्नाचा थवा थिजला होता...
उत्तराला शब्दाचा तुझ्या, आसरा मिळाला होता....

मागे वळून पहाता गाभारा भरला होता....
देवाची ओळख होताच, तो रिकामा झाला होता....

मागे वळून पहाता हिशोब राहिला होता,
घेण सरले आता, देण्याचाच विचार मनात होता....

मागे वळून पहाता मार्ग सापडला होता,
देताना विश्वप्रार्थना घेत रहावे, हा मंत्र नवा होता....

        🌸  मागे वळून पहाता सर्वाना      शुभ प्रभात  🌸

                                 विठ्ठल घाडी  चारकोप
                                    ९१६७७५५२०३

शुभ प्रभात दोन फेब्रुवारी दोन हजार सोळा

पसरता किरणे पहाटेची , हलकेच निघून रात गेली....
स्वप्नांना नवे पंख, देऊन रात गेली....

स्वप्नातील काजवे हि, घेतील भरारी उत्कर्षाची...
त्यांच्या नैराश्याचे पंख, छाटून रात गेली....

स्वप्नातील मनसुबे आता, उधळणार नाहीच कदापी...
त्या निरुत्तर प्रश्नांचे गाठोडे, घेऊन रात गेली...

स्वप्नातील कॅनव्हास माझा, आता रंगेल सप्तरंगांनी....
नवं नव्या रंगानी मनाला, रंगवून रात गेली....

पापे कितीक होती, सत्कर्माचा अर्थ नव्याने कळला....
अट्टाहास शुभ चिंतनाचा, मागूनी रात गेली....

माझ्यातले दिव्यत्व आता,  मज जाणवू लागले...
सर्वांसाठीच " विश्वप्रार्थना " मुखी वदवून रात गेली....

🌸 अशी सुंदर पहाट पहाणाऱ्या सर्वांना शुभ प्रभात  🌸
                         विठ्ठल घाडी  चारकोप
                             ९१६७७५५२०३

Monday, February 1, 2016

shubh prabhat 1 februvari 2016

🌺🌺  बघायला गेलं तर खूप आहे,
            रोजच्या दुःखाला वेग वेगळं रूप आहे....

शोधायला गेलं तर खूप आहे,
            निसर्गाचे " देणं " शिकलो तर, तेच खरं सुख आहे....

सोडायला गेलं तर खूप आहे,
            राग लोभाला गंधित करणारे,
" शुभ चिंतन " हेच धूप आहे....

द्यायला गेलं तर खूप आहे,
         देतानाच सहस्त्रपटीने मिळते,
हीच ग्यानबाची मेख आहे...

मागायला गेलं तर खूप आहे...
          मागताना " निस्वार्थ " भाव जपण्याचे एक "शास्त्र" आहे....

मिळवायला गेलं तर खूप आहे,
           विश्वप्रार्थनेतच " संकल्प सिध्दीचे गुपित " आहे.

🌸  संकल्प असलेल्या सर्वांना
           शुभप्रभात. 🌸
                             vitthal ghadi charkop
                                91677 55203

Saturday, January 30, 2016

शुभ प्रभात एकतीस जानेवारी दोन हजार सोळा

सागराच्या प्रत्येक लाटेत पाणी आहे म्हणजेच सागर आहे.....

सकाळच्या किरणांत प्रकाश आहे म्हणजेच सूर्य आहे.....

गंधाळलेल्या प्रत्येक पाकळीत रंग आहे म्हणजेच फुल आहे....

भेटणाऱ्या प्रत्येकाला एक नाव आहे म्हणजेच प्रत्येकात चैतन्य आहे....

प्रत्येक क्षण वेगळा असला तरी त्या प्रत्येकात आनंद आहे....

प्रत्येक शब्दाला अर्थ आहे म्हणूनच ती विश्वप्रार्थना आहे...

🌸  वेग वेगळी दिसत असली तरी एक असणाऱ्या सर्वांसाठी शुभ प्रभात  🌸

                           विठ्ठल घाडी , चारकोप
                              ९१६७७५५२०३

Friday, January 29, 2016

शुभ प्रभात तीस जानेवारी दोन हजार सोळा

 उगवला कि मावळणार आहे तो त्याच्या बरोबर मावळून जा,
     जाताना मात्र येण्याची आस ठेवुन जा.....

फुलली सदाफुली, गंधाळला प्राजक्त त्याच्यांबरोबर गळून जा,
     गळतांना मात्र अखंड सुवास ठेवून जा...

गाभाऱ्यात दिवा तर रानात पेटतोय वणवा तसेच पेटून जा,
       जळताना मात्र अंतरात ज्योत लावून जा...

झुळझुळतोय झरा धावतेय नदी धाव धावून सागरात मिळून जा....
        वहाताना मात्र तहान भागवून जा.....

यांनी दिल त्यांनी दिल घेतलेलं सर्व काही लक्षात ठेवून जा,
       घेतलेलं जगतानाच विश्वप्रार्थनेतून सर्वाना देऊन जा...

🌸  घेणाऱ्या देणाऱ्या सर्वाना शुभ प्रभात....  🌸

                      विठ्ठल घाडी चारकोप
                        ९१६७७५५२०३

Thursday, January 28, 2016

शुभ प्रभात एकोणतीस जानेवारी दोन हजार सोळा

रात्रीच्या काळोखात भीतीचा लवलेश नसावा....
         प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा...

पहाटेचा आनंद इतरांना वाटावा...
          -प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा...

मनातला प्राजक्त सगळीकडे दरवळावा....
         प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा...

जगातला एक एक प्रश्न सहज सुटावा....
        प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा...

दिवसभराचा ताण थोडासा कमी व्हावा...
          प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा....

पुन्हा निवांत एक एक क्षण आठवावा....
           प्रत्येकाला वाटत सोबत कुणीतरी असावा....

जगलेल्या प्रत्येक क्षणात सर्वांचा सहभाग आठवला .....
         त्यासाठीच तर प्रार्थनेचा शब्द न शब्द सर्वांसाठी मागावा ....

 प्रत्येकाच्या जीवनात सहभाग असलेल्या सर्वांना शुभ प्रभात

                                vitthal ghadi , charkop
                                  9167755203

शुभ प्रभात अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सोळा

रोज पहाटे मी एक चित्र पाहिलं..
वेलीवरची फुले तोडुनि गाभाऱ्यात वाहिली.....

दिवसभर मन त्याच वेली भोवती घुटमळल,  पुन्हा पहाटे ती तशीच सुगंधली....

माझ्याच अंतरंगात जरास डोकावलं, माझ्याच गाभाऱ्यासाठी इतरांची मने खुडली....

आज फुल वहाताना थोडासा थांबलो, चरणांआधी मनाचा गाभाराच सुगंधला....

बाहेर आलो प्रत्येक गाभारा निरखु लागलो, त्यातील देवाला विश्वप्रार्थना वाहू लागलो.....

सर्व गाभाऱ्यातील सर्वांना शुभ प्रभात.....

                                 विठ्ठल घाडी , चारकोप
                                    ९१६७७ ५५२०३

Wednesday, January 27, 2016

शुभ प्रभात सत्तावीस जानेवारी दोन हजार सोळा

रात के अंधेरेमे लाखो चमकते तारे हमने देखे...
तोडकर उन्हें कदमो बिछानेके वादे भी कर देखे....

एक तारा हाथ न लगा, सुबह कि धूप में सब खो गये.....
दुनिया कि रंगमंचपर चलते इंसानोसे हँसना भी हम भूल गये....

सितारोंको जमींपर लाना आसां लगा था, जहां हर एक इन्सान जुडने को बैचेन था...
बस्स अब सितारोंको दूर से हि देखा करेंगे, हर एक को जुडनेका तंत्र हाथ आया था....

नजर के पार कितने तारोंको देखना हम भूले थे...
जिंदगी आसां करनेवाले हाथ कहा हमें याद थे....

सितारोंके साथ अब हम जहां के हर एक को याद करते है,
विश्वप्रार्थना से सबको मांगता हूं,  जिनसे दिनकी शुरुवात करते है.....

🌸  सितारों जैसे चमकनेवालो सबको शुभ प्रभात  🌸

                                    vitthal ghadi charkop
                                      9167755203

Tuesday, January 26, 2016

विठ्ठला.......

आपल्या मुखातून सहज उमटलेल्या " विठ्ठला " या स्मरणाला कुणी तरी विचारले विठ्ठला हि काय भानगड आहे ऐकले आणि शब्द जवळ आले

" विठ्ठला " हि भानगड नाही, ती एक भाव भक्तीची सांगड आहे...

विठ्ठला, एक मंत्र आहे, सुखी जीवनाचे तंत्र आहे...

विठ्ठला, एक भाव आहे, विटेजवळ थांबलेली धाव आहे...

विठ्ठला, एक अर्थ आहे, संसारात राहून करायचा परमार्थ आहे....

विठ्ठला, एक आस आहे, प्रत्येकाच्या सुखाचा तो ध्यास आहे....

विठ्ठला, एक ध्यान आहे, निस्वार्थ केलेलं ते दान आहे...

विठ्ठला, एक नाम आहे, चारी मुक्तीचे ते धाम आहे...

विठ्ठला, एक गाभारा आहे, स्वछंद मनाला घातलेला तो बंधारा आहे...

विठ्ठला, एक स्पंद आहे, मनामनाला जोडलेला तो बंध आहे....

विठ्ठला, एक असा संग आहे, ज्ञानेशाची ओवी तर तुकीयाचा अभंग आहे....

विठ्ठला, हि एक साद आहे, आपल्याच आत मिळणारा प्रसाद आहे...

                                          विठ्ठल घाडी  चारकोप
                                             ९१६७७ ५५२०३

शुभ प्रभात सव्वीस जानेवारी दोन हजार सोळा

आज पहाटेचे सप्तरंग उधळलेच नाही, तीन रंगाला आभाळ पूरलेच नाही.....

घरातल्या हसऱ्या कळ्या, कुंकू अन त्या हातातले कंगण विसरले पण ...!
मायेचे आशिष अन भू मातेचे रक्षण विसरले नाही...

त्या नजरेला अन त्यांच्या शौर्याला गनीम विसरला असेल पण...!
आमच्या नजरेतून ते भारतमातेचे पुत्र विरले नाही...

आजही  त्या सर्वांचे स्मरण होताना, मनामनातुन मानवंदना सहज उमटते.....

म्हणूनच त्यासर्वांसाठी क्षणा क्षणाला विश्वप्रार्थना मुखात गुंजत रहाते....

 प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा अन शुभ प्रभात 

                            विठ्ठल घाडी चारकोप
                              ९१६७७५५२०३

Monday, January 25, 2016

शुभ प्रभात पंचवीस जानेवारी दोन हजार सोळा

आली आली म्हणता लाट परत गेली, किनाऱ्याला स्पर्श करून पुन्हा विरघळून गेली...
          दुःख हि अशीच असतात पापणी मिटता मिटता पहाट होते, दिशा दिशा सप्तरंगात उजळून निघते....

        प्रश्न समस्या येतात ती शिकत सोडविण्यासाठीच ....
       आनंदस्वरूप रूप आपले, जगायचे ते आनंद वाटन्यासाठी....

       सुंदर निसर्गात फिरताना मन हरखून जाते..
        विश्वप्रार्थना म्हणताना मन व्यापक होऊन रहाते...

                         सर्वांना शुभ विचारांची  शुभ प्रभात

                                    विठ्ठल घाडी चारकोप
                                       ९१६७७  ५५२०३

शुभ प्रभात चोवीस जानेवारी दोन हजार सोळा

गाढ झोपेत खरच मी जागा होतो...
स्वप्नात हि तुझ्यासवे उभा होतो...

दिसणं थांबलं होत पण असणं महत्वाचं होत...
मी थकून पहुडलो होतो, तुझं कार्य आत सुरु होत...

जाग येताच तुला पहाणार होतो, तुझ्या बागडण्यात मीच दिसणार आहे.....
शुभ चिंतनात तुलाच मागत होतो, सर्वांच्या घरात हास्य दरवळणार आहे.....

तू आणि मी एकच आहे, निसर्गाशी जोडलेलं आपलं नात आहे...
पेरलं तेच उगवलं आहे... शुभ चिंतन म्हणजेच " विश्वप्रार्थना " एक शास्त्र आहे.....

शास्त्र समजलेल्या व न समजलेल्या सर्वांना शुभ प्रभात 

शुभ प्रभात तेवीस जानेवारी दोन हजार सोळा

   भूतकाळ आधार असतो....
      भविष्य विश्वास असतो तर
 वर्तमान श्वास असतो....

 भूतकाळात वळून पहावं, भविष्याचा वेध घ्यावा....
भविष्याच वेड असावं त्यावेडासाठी वर्तमान जगून घ्यावं....

   जगताना भविष्यावर लक्ष असावे, केवळ भास आभास नसावे.....
वर्तमानाचे चित्र रंगवताना, विश्वप्रार्थनेच्या रंगात रंगुनी जावे.. ..

 भूत भविष्य केवळ भास नसलेल्या वर्तमानातील सर्वांना शुभ प्रभात.....


                                       विठ्ठल घाडी चारकोप
                                         ९१६७७५५२०३  

Friday, January 22, 2016

शुभ प्रभात बावीस जानेवारी दोन हजार सोळा

किनाऱ्याला येऊन परत जायचे, सागराला माहीत आहे....
        रीत होऊन परत भरून रहायचे सागराला माहीत आहे....

    सर्वांना सामावून घेताना आपली मर्यादा ओलांडायची नाही सागराला माहीत आहे....
     आहे तिथूनच सर्व सृष्टीवर बरसण्यासाठी स्वतःला जाळून घ्यायचं सागराला माहीत आहे...

    संथ कधी रुद्र, भरती कधी ओहोटी सतत वाहत रहायचं सागराला माहीत आहे....
     रिकामंपणी कधी कामात आठवून कधी विसरून म्हंटली तरी सर्व काही द्यायचं विश्वप्रार्थनेला माहीत आहे....

स्मरणात अन विस्मरणात असलेल्या सर्वांना शुभ प्रभात

                                     विठ्ठल घाडी , चारकोप
                                        ९१६७७५५२०३

Thursday, January 21, 2016

शुभ प्रभात वीस जानेवारी दोन हजार सोळा

आज स्वप्नात नाजूक पावलं वाजली....
       चिमुकल्या बोटांच्या स्पर्शानी जाग आली...

       ती परी होती का सोनपरी माझेच मला कळेना....
       खुदू खुदू हास्य तिचे मनातून काही निघेना....

       कोण होती, का आली प्रश्नात मी अडाक्लो नाही...
       ती विश्वासक नजर ते निर्मळ हास्य मी विसरणार नाही....

        तीच ते निरागस दिसणं शोधण्याचा मी प्रयत्न करतोय....
       प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच हास्य झळकताना पहातोय....

       परीच्या नाजूक,कोमल स्पर्शात आनंदच वहाताना पाहिला....
       विश्वप्रार्थनेचा शब्द न शब्द जसा मागण सोडून देणच शिकवून राहिला...

 सर्वाना काही न काही  देणाऱ्या तुम्हा सर्वांना शुभ प्रभात....

                               विठ्ठल घाडी , चारकोप
                                 ९१६७७५५२०३

शुभ प्रभात एकवीस जानेवारी दोन हजार सोळा

अंधाराचे खडे पहारे तोडून आला पहा तो नारायण....
          प्रश्नाच चक्रव्युह भेदुनी चला मुक्त होऊ या आपण...

       काळा कभिन्न पडदा सरता लाल रंग हा आसमंतावर रंगला...
       दाट धुक्याची दुलई सरकवुनी थंड गुलाबी वारा आला...

      कुठे चिवचिवने तर कुठे कुहुकुहुने वाजते मंदिरातही घंटा...
       मंद मंद सुंगंधात गाय वासराच्या खुराणी मळल्या पाऊलवाटा....

      आनंदाची उधळण करीत दिवस हा,  मागण्याआधीच घेऊन आला...
       विश्वप्रार्थनेतून सर्वांना मागताच " तो " आपल्याच ठिकाणी भरून राहिला....

 सर्वांच्या ठिकाणी भरून राहिलेला तो त्याला त्याचाच कडून शुभ प्रभात

                                    विठ्ठल घाडी , चारकोप
                                      ९१६७७ ५५२०३         

Wednesday, January 20, 2016

शुभ प्रभात एकोणीस जानेवारी दोन हजार सोळा

आज स्वप्नात नाजूक पावलं वाजली....
       चिमुकल्या बोटांच्या स्पर्शानी जाग आली...

       ती परी होती का सोनपरी माझेच मला कळेना....
       खुदू खुदू हास्य तिचे मनातून काही निघेना....

       कोण होती, का आली प्रश्नात मी अडाक्लो नाही...
       ती विश्वासक नजर ते निर्मळ हास्य मी विसरणार नाही....

        तीच ते निरागस दिसणं शोधण्याचा मी प्रयत्न करतोय....
       प्रत्येकाच्या चेहऱ्यावर तेच हास्य झळकताना पहातोय....

       परीच्या नाजूक,कोमल स्पर्शात आनंदच वहाताना पाहिला....
       विश्वप्रार्थनेचा शब्द न शब्द जसा मागण सोडून देणच शिकवून राहिला...

 सर्वाना काही न काही  देणाऱ्या तुम्हा सर्वांना शुभ प्रभात...

                                             विठ्ठल घाडी , चारकोप
                                                 ९१६७७५५२०३.

Monday, January 18, 2016

शुभ प्रभात अठरा जानेवारी दोन हजार सोळा

नींद खुली सपने बिखर गये, पर यारों...
रात के अंधेरे दूर ना होते, तो कितने फसाद होते....

        भगवान कि चरणोंमें चढाने फुल खील गये, पर मेरे यारों...
वो महकना छोड देते, तो कितने फसाद होते....

      आँसू भरी नजर कुछ कह गयी, पर मेरे यारों...
वो बहेना छोड देते, तो कितने फसाद होते....

       सवाल जिंदगीके शराबमें डूबोते है, मेरे यारों,
समंदर शराब के होते, तो कितने फसाद होते....

       मैं, मेरे अपनों कि चाहतमें इन्सानियत भूल जाते है लोग...
सबके सुख कि " विश्वप्रार्थना " ना होती, तो कितने फसाद होते....

सब फसाद मिटाने कि सोचनेवालों सबको, " शुभ प्रभात "

                                   विठ्ठल घाडी , चारकोप
                                       ९१६७७५५२०३

Friday, January 15, 2016

शुभ प्रभात पंधरा जानेवारी दोन हजार सोळा

 तिळगुळ घ्या गोड गोड बोला.... एकच वाक्य वर्षभर पुरते....
       दिवस सरतो अन पुसले जाते, रस पिळून घेता उसाचे चिपाडच उरते...

      बारीकसा तीळ झोडपल्याशिवाय मिळत नाही, गुऱ्हाळात पिळून घेतल्या शिवाय गूळ बनत नाही....

         सुख दुःखाच्या क्षणाना शुभ चिंतनाने झोडपून सुखाचेच तिळ मिळवा....
         सत्संगाच्या गुऱ्हाळातील शुभ विचारात आपले विचार सतत घोळवत ठेवा...

         तयार झालेला गोडवा सातत्याने वाटण्यास सज्ज व्हा...
        पतंगा सम भरारी घेत प्रत्येकाच्या मनाचा ठावं घ्या....

        आहात तिथूनच विश्वातल्या सर्वांना गॉड गॉड सहवास द्या...
        विश्वप्रार्थनेच्या रसात आपल्या मनाला सातत्याने डुंबू द्या....

 कोणी हि असा, कसे हि असा सर्वांशी जोडलेल्या तुम्हांसह सर्वांना शुभ प्रभात आणि शुभ संक्रात ...

                                                विठ्ठल घाडी , चारकोप
                                                   ९१६७७५५२०३

शुभ प्रभात चौदा जानेवारी दोन हजार सोळा

आज दिवस तसा रोजच्या सारखाच, उगवला थोडासा गारवा घेऊन....
      तसा तो रोजच येतो रोजच बोलतो, आज आला शब्दांची गोडी लेवून....

      सागराचे पाणी सरणार नाही, निसर्गाचे देणं थांबणार नाही....
      तुम्हां सर्वांना गोड बोलायला आज मी सांगणार नाही....

      माझ्या आयुष्यात तुम्ही पेरलेल्या गॉड गॉड बिया मी मोजणार नाही....
      आनंदाचा सागर तुम्ही, सुखाचे आगर तुम्ही....
      म्हणूनच....
     तुम्हांसह सर्वांसाठी गॉड विचारांची
" विश्वप्रार्थना " म्हणायचे मी सोडणार नाही....
🌸   आजच्या या गॉड प्रभाती गोड गोड शुभेच्छा.
                                   विठ्ठल घाडी , चारकोप
                                       ९१६७७५५२०३

शुभ प्रभात तेरा जानेवारी दोन हजार सोळा

सागरात पाणी, लाटेत पाणी, थेंबातही पाणीच....
         जगात प्रश्न, समाजात प्रश्न, कुटुंबातील मी प्रश्न माझेच....

        चराचरात भरला तो कुठे हसतो, कुठे बोलतो, कुठे फक्त दिसतो....
        जिथे कुठे बोलतो, दिसतो थोडासा विचार करता तो तर माझेच प्रश्न सोडवतो....

        पाणी रुपाने दिसले, जिभेने चाखले तेच देहाने स्विकारले....
        पूर्वजांनी सांगितले, दगडात दाविले त्याच देवाला मनामनाने पुजले...

        हवे तेव्हा जागेवर अन्न, पाणी, वस्त्र पुरविले त्या देवांना कुठे शोधू या.....
         जेथे आहोत तेथूनच त्यांच्यासह सर्वांसाठी विश्वप्रार्थनेतून सर्वकाही मागू या..

🌸  असणाऱ्या, दिसणाऱ्या, बोलणाऱ्या हसणाऱ्या सर्वासाठी शुभ प्रभात   🌸

शुभ प्रभात बारा जानेवारी दोन हजार सोळा

चल पडा था अपनी राह में, सुरज कि थंड थंड किरणोमे....
         एक आवाज आयी नर्म सी दबी दबी, क्यू रख गये मुझे इस कोनेमें.....

      बाती बिना घर का दिया कैसे जला पावोगे....
सुबह कि किरण ना निकली तो अंधेरेमे हि खो जाओगे....

         सुरज कि रोशनी चांद कि चांदणी मन को लुभाती है....
          किमती दिया नही बाती हि सारा घर जगमगाती है....

          अंधेरेसे निकली तो कई आवाजों एक हि सवाल था क्या हुवा ?
          इन आवाजों को चिरता एक मासूम सवाल आया बच्चा कैसा है....

      यह थी हमारी पहचान हमारा अस्तित्व, हमारी मुस्कान....
       अगर वो ना होती तो ना होती आपसे मुलाखत ना जहां कि पहचान...

     जिन्होंने दिखालायी सुरज कि पहली किरण, सिखलाया खिलखीलाना...
     चलो क्यू न करे उन सबको अर्पण आजकी " विश्वप्रार्थना " ....

🌸 भगवान कि पहली पहचान और सबको शुभ प्रभात  🌸

                                           विठ्ठल घाडी,  चारकोप
                                                ९१६७७ 55203

Monday, January 11, 2016

शुभ प्रभात अकरा जानेवारी दोन हजार सोळा

 रात्रीच्या काळोखात अनेक स्वप्न समोर आली.....
           एका स्वप्नाला कुशीत घेता, सारी तिथेच रेंगाळु लागली....

         मी सुद्धा त्या स्वप्नांना दूर लोटलं नाही ....
         कुशीतलं स्वप्न त्यांच्या शिवाय पूर्ण होणारच नाही...

         पहाट होताच स्वप्न मनात येते, शब्दात उतरते....
         प्रयत्नाने शब्दांची कळी फुलाचा आकार घेते....

        फुलांच्या रंग रुपात, गंधात प्रत्येकजण हरखून जातो....
        या फुलांसोबत असलेल्या स्वप्नांना मी कधीच विसरत नसतो....

  त्यासर्वांसाठी विश्वप्रार्थनेत आजची शुभ प्रभात सुगंधित व्हावी ...

                                             विठ्ठल घाडी , चारकोप
                                                 ९१६७७ ५५२०३

Saturday, January 9, 2016

शुभ प्रभात दहा जानेवारी दोन हजार सोळा

अंगणात माझ्या प्राजक्ताचा सडा पडला, पानापानात दरवळला मातीतहि सुगंधाचा....
       दिवस उजड़ताच प्रश्नाचा थवा दिसू लागला... प्रसन्न चेहरा का कोमेजला....

       प्रश्न सुटला तो परमानंद तर न सुटलेल्या प्रश्नातसुद्धा शिकण्याचा आनंद.....
       मिळविण्यासाठी त्याची केली याचना, होऊ द्या आता मिळाल्यासाठी
" विश्वप्रार्थना ".....

 आज पर्यंत ज्यांनी ज्यांनी दिल त्यांच्यासह सर्वांना शुभ प्रभात

                                                विठ्ठल घाडी , चारकोप
                                                   ९१६७७ ५५२०३

शुभ प्रभात नऊ जानेवारी दोन हजार सोळा

चोवीस तासांचा दिवस मंग तो मावळतीलाच संपतो का ...

दिवस म्हणून मोजला जातो आणि अर्ध्याच आनंदात जगतो का....

माणूस भेटला हास्य आतून येत, निघताना त्याच्या सुखाचा विचार येतो का ....

रात्री झोपताना किती डोळ्यात सामावून,  आपले विचार थांबतात का...

विचार हा दिन रात वाहणारा झरा आहे, तो झुळझुळ वहातो का हाच प्रश्न आहे...

वहाताना बरेच काही घेऊन वहातो, स्वतःच अस्तित्वच विसरून जातो...

विश्वप्रार्थनेचा जागर असतो, तोच तर दिव्य विचारांचा आत्मलिंगावर अभिषेक असतो....

  दिवसभर सर्वांवर होणाऱ्या अभिषेकाच्या शुभेच्छा..

                                                    विठ्ठल घाडी , चारकोप
                                                       ९१६७७ ५५२०३

Friday, January 8, 2016

शुभ प्रभात आठ जानेवारी दोन हजार सोळा

 चोवीस तासांचा दिवस मंग तो मावळतीलाच संपतो का ...

दिवस म्हणून मोजला जातो आणि अर्ध्याच आनंदात जगतो का....

माणूस भेटला हास्य आतून येत, निघताना त्याच्या सुखाचा विचार येतो का ....

रात्री झोपताना किती डोळ्यात सामावून,  आपले विचार थांबतात का...

विचार हा दिन रात वाहणारा झरा आहे, तो झुळझुळ वहातो का हाच प्रश्न आहे...

वहाताना बरेच काही घेऊन वहातो, स्वतःच अस्तित्वच विसरून जातो...

विश्वप्रार्थनेचा जागर असतो, तोच तर दिव्य विचारांचा आत्मलिंगावर अभिषेक असतो....

                                                दिवसभर सर्वांवर होणाऱ्या अभिषेकाच्या शुभेच्छा.

                                                                  विठ्ठल घाडी  चारकोप
                                                                      ९१६७७ ५५२०३

Thursday, January 7, 2016

शुभ प्रभात सात जानेवारी दोन हजार सोळा

🌺 🌺 जाग आली चिव चिवल्या चिमण्या, कुहुकुहूली कोकिळेची मंजुळवाणी....
कधी कुठे केली कुणी मान सन्मानाची धनी....

चांदण्या लोपल्या उगवतीला नारायण वर आला....
ऊर्जा देऊनी तापलेल्या जीवांचा रोषच पत्करला....

छाया दिली सुगंधी फुलांसह, मधुर फळांचा नजराणा पेश केला..
परि मानवाच्या गरजेसाठी त्यांने कुऱ्हाडीचा घाव सोसला...

विविध ढंगी नटलेला हा नटरंगी देव का दिसेना....
पर्यावरणात लपलेला नारायण सहज का पहा ना....

कृतज्ञतेचा भाव मनी जपुनी, आपण एकच करुया ना...
रिकामपणी सतत विश्वप्रार्थना आपण म्हणु या ना.....

🌸  कृतज्ञतेपूर्वक सर्वांना शुभ प्रभात 🌸

                                              विठ्ठल घाडी , चारकोप
                                                   ९१६७७ ५५२०३

Wednesday, January 6, 2016

शुभ प्रभात सहा जानेवारी दोन हजार सोळा

माझ्या हसण्याने नाही माझ्या रडण्याने नाही..
दिवस उगवायचा किंवा मावळायचा थांबत नाही....

माणूस येतो समोर, मी हसतो बोलतो त्याला जोडतो....
तो आनंद घेतो का नाराज होतो प्रश्न कधी आपणास पडतो....

उत्तरासाठी मी स्वतःलाच न्याहाळतो, कुसळ हि मुसळ दिसू लागते....
दुसऱ्याच्या डोळ्यात माझेच प्रतिबिंब मला माझ्या चुका दाखवीत असते....

आनंदाचा स्वामी मी आनंद वाटताना एकच गोष्ट करण्यास विसरत नसतो....
समोर येणाऱ्या प्रत्येकाला हव हवं ते देणारी विश्वप्रार्थना म्हणत असतो....

मला भेटलेल्या न भेटलेल्या सर्वांना आजचा दिवस शुभ जावो 🙏

                                                               विठ्ठल घाडी , चारकोप
 

विठ्ठल एकरूप जाहला.....

पांडुरंगाला शोधावयास राऊळात गेलो,

तो पुंडलिकाच्या सेवेत होता जनाईच्या भावात होता....
माणसांच्या गावात होता तर नामाच्या गजरात होता...

        टाळ चिपळीच्या एक सुरात होता तर मृदूंगाच्या नादात होता...
        माझ्याच विचारात भासला तर झाडांच्या पानात सळसळला...

वेलीच्या कळीत फुलला तर फुलांच्या गंधात दरवळला...
विश्वात ठासून भरला तर प्रत्येक जीवात समोर उभा ठाकला....

        आसमंतात निळ्या रंगात शोभला तर अथांग सागरात सहज उतरला....
        पहाटेच्या किलबिलाटात जागला तर बोबड्या बोलात दुमदुमला....

थरथरत्या स्पर्शात आनंदला तर तरुण स्वप्नात झेपावला..
अभंगाच्या शब्दात होता तर भक्तांच्या ओठात होता...

शब्दांचे अर्थ अन
     अभंगाचा भावार्थ जाणला तर...
तो माझ्याच हृदयात होता....
         माझ्याच हृदयात होता....

                    आज मी पांडुरंग पाहिला समोर विठ्ठलच भेटला...
                    त्या दिव्य शब्दात उमगला त्याच नजरेनं पाहिला ....

      विठ्ठल एकरूप जाहला....
              विठ्ठल एकरूप जाहला.....


                                          विठ्ठल घाडी , चारकोप
                                               ५ जाने २०१६

शुभ प्रभात पाच जानेवारी दोन हजार सोळा

आकाशात लाखो तारे असतात , चमकताना काहीच दिसतात...

     आपल्या आजूबाजूला चालणारे अनेक असतात,
साथ संगत काहीच निभावतात...

ढग काळे होऊन आसमंतात पसरतात,
आवाज न करता काहीच बरसतात....

    जीवनात दुःखाचीच गर्दी वाढताना दिसते,
टाळता न येणारी काहीच संख्या असते....

      स्वतःसाठी मागणारी सर्वच असतात,
सर्वांसाठी मागून काहीच निरपेक्षपणा जगतात....
    
     प्रत्येकाच्या प्रार्थना वेगवेगळ्या असतात,
विश्वप्रार्थनेत सर्व प्रार्थना सामावलेल्या दिसतात....

🙏  प्रार्थनेतील सर्वांना शुभ प्रभात  🙏
                                                         विठ्ठल घाडी, चारकोप
  vitthala.blogspot.com

Monday, January 4, 2016

पहिलं पाउल

आज मी आलो , पाहुनी थबकलो....
या नवीन जागी, शब्दांना साद घातली...
थोडासा बावरलो, थोडासा सुखावलो ...
आपल्या ओळखीची, खुणगाठ मी बांधली....
जरा स्थिरावलो, जरा जरासा लीन झालो ...
आपली साथ लाभावी,  हीच प्रार्थना केली....